Tuesday, January 22, 2008

काय कटकट आहे ही !

च्यायला, हा blog नावाचा प्रकार कोणी काढला अन का काढला? काही कामधंदा नसलेल्या माणसांनी इतर कामधंदा नसलेल्या माणसांसाठी िलहीलेला िबनकामाचा वाक्यसंग्रह म्हणजे blog अशी याची थोडक्यात व्याख्या करता येईल. ’आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग’ असे blog लिहीण्यामागचे एक पळपुटे कारण सांगितले जाते. हे साफ़ खोटे असते. माझ्यामते, चारचौघात तुमचे कोणिही ऐकून घेत नाही , तुम्हाला कोणी भाव देत नाही म्हणून मनातल्या साचलेल्या, तुंबलेल्या विचारांचा निचरा व्हावा म्हणून ही लोकं blog लिहायला लागतात.

पूर्वीच्या काळी नवोदीत लेखक पांढर्या कागदावर काहीतरी काळे करून प्रकाशकांचे उंबरठे झिजवत. मग अशा १०० ’लेखकां’पैकी एकाचा लेख वर्तमानपत्रातील पुरवणीमधे ’बॉंडपटातील मदनिका’ , 'रूपेरी पदद्यावरील नायिका आणि पाऊस’ , ’गोष्ट रवी शास्त्रीच्या ऑडीची’ यांमधून उरलेल्या जागेत (’जागा उरलीच तर’ असे म्हणणे उचित ठरावे) छापून येई अन ’लेखक’ साताजन्माचे पुण्य लाभल्याच्या खुषीत सुखाने ’देह ठेवीत’ असे. आजकाल मात्र जो तो लेखक बनू पाहतो. फुकट प्रकाशक मिळाल्याने ’उचलली जीभ लावली टाळ्याला’ याप्रमाणे ’धरला keyboard लागला छापायला’, असे करून blogs च्या blogs लिहीले जात आहेत.

बरं, हे bloggers नुसते blogs लिहून थांबत नाहीत, तर मित्र, आप्तेष्टांना link पाठवून वाचायला भाग पाडतात. "अरे, नवीन blog लिहीलाय. निवांतपणे वाचून बघ बरं. जरा लांबला आहे का रे? थोडा criticize कर नां, नुसता ’चांगला आहे’ म्हणू नको. आणि comments लिहायला विसरू नकोस." असे करून सगळा blog वाचायला लावतात. (जसं काय, आम्हाला आयुष्यात मिळालेला सगळा निवांत वेळ ह्या सर्व लोकांचे blog वाचण्यातच खर्च करायचा आहे.) आणि मग त्या रद्दी blog मधून काही चांगले points शोधून काढणे, criticize च्या नावाखाली सगळ्या चुकांपैकी फ़क्त १०%, त्यातल्या त्यात बर्या , चुका सांगणे यात आपला बराचसा वेळ जातो. कधीकधी ह्या comments लिहिण्यासाठी त्या blog च्या site ला register करणे आवश्यक असते. माझे या blog विश्वात पदार्पण सुद्धा अशाच एका क्शुद्र blog ला comment लिहिण्याच्या निमित्तानेच झाले आहे.

वर्तमानपत्रातले रटाळ लेख आणि blog यात फ़रक हाच की ते लेख मित्राने लिहीलेले नसतात, त्यामुळे वाचण्याची सक्ती नसते. म्हणजे उद्या माझ्याकडे police times वाले येऊन ’एवढा लेख जरा वाचून अभिप्राय कळवा’ म्हणाले तर मी त्यांच्या ’डोक्यात दगड घालून’ police times च्या पुढच्या issue साठी फ़ुकट खाद्य पुरवेन. याउलट, ह्या blog वाल्या मित्रांना मात्र ’गोड comments’ लिहाव्या लागतात. वैताग आहे नुसता...

आता एवढा सगळा blog लिहील्यावर मलाही वाटायला लागलयं की कुणितरी हा blog वाचावा. bloggers ला घातलेल्या माझ्या शिव्या कुणि चारचौघात ऐकूनच घेत नाहीत, म्हणून हा blog लिहावा लागला. नाहीतर माझा ह्या blog प्रकाराला सक्त विरोधच आहे. तुम्ही मात्र थोडा वेळ काढून वाचलाच आहात. धन्यवाद! काय आहे, हा माझा पहिलाच blog नां, so थोडा(च) criticize करा, नुसता ’चांगला आहे’ म्हणू नका . जरा प्रोत्साहन द्या. आणि हो, comments लिहायला विसरू नका...